Pakistan Attack: पाकिस्तानवर पुन्हा हल्ला; दुसऱ्या सर्वात मोठ्या नौसेना तळावर माजिद ब्रिगेडकडून गोळीबारासह बॉम्बस्फोट

रात्री उशीरा पाकिस्तानमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या नौसेना तळावर हल्ला झाला आहे. तुरबतमधील पीएनएस सिद्दिकी नौसेना तळावर हा हल्ला झाल्याचं स्थानिक माध्यमांनी सांगितलंय. परिणामी तिथली वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Photo Credit -Twitter

Pakistan Attack: २०२४ हे पाकिस्तानसाठी वाईट वर्ष असल्याच दिसत आहे. कारण, सध्या पाकिस्तानवर हल्ल्यांचे (Attack On Pakistan) प्रमाण वाढले आहे. काल सोमवारी रात्री उशीरा देखील पाकिस्तानवर हल्ला झाला. शेजारील बलुचिस्तान देशाकडून पाकिस्तानवर हल्ले करण्यात आले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या Balochistan Liberation Army (BLA) माजिद ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. (हेही वाचा: Azam Cheema Dies In Pakistan: लष्कर-ए-तैयबाचा गुप्तचर प्रमुख आणि 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आझम चीमा याचे पाकिस्तानात निधन)

गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तानमध्ये चीन गुंतवणूक करत आहे. त्यावर माजिद ब्रिगेडने नाराजी व्यक्त केली आहे. त्याशिवाय, बीएलएने दावा करण्यात आलाय की, त्यांचे फायटर्स नौसेना तळामध्ये घुसले आहेत. तसेच या भागात चिनी ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. मिळालेलया माहितीनुसार, फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यात अनेक हेलिकॉप्टरचा समावेश आहेत. मोठ्या हल्ल्याआधी तीन तासांपासून त्याठिकाणी गोळीबार सुरू होता. (हेही वाचा:Attack on Pakistan Military Post: पाकिस्तानी लष्करी चौकीवर हल्ला, सुरक्षा दलाचे 5 जवान ठार )

हल्ल्यात डझनपेक्षा जास्त पाकिस्तानींचा मृत्यू झाला आहे. बीएलएकडून यासंदर्भात एक ऑडिओ देखील समोर आणण्यात आला आहे. यात माजिद ब्रिगेडकडून झालेला हा आठवड्यातील दुसरा तर या वर्षातील तिसरा हल्ला आहे. याआधी २९ जानेवारी रोजी पाकिस्तानच्या माच शहरावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर २० मार्च रोजी ग्वादर बंदरावर हल्ला झाला होता. याच ठिकाणी लष्कराचे एक गुप्त मुख्यालय आहे. या हल्ल्यामध्ये दोन पाकिस्तानी कर्मचारी आणि आठ दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती.