WhatsApp चं नवं फिचर; लवकरच देणार Video Quality निवडण्याचा पर्याय

त्यानंतर आता अजून एक नवं फिचर लॉन्च करण्याची घोषणा व्हॉट्सअॅपने केली आहे. यामध्ये एखाद्याला व्हिडिओ पाठवताना तुम्ही व्हिडिओची क्वॉलिटी निवडू शकता.

WhatsApp (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वीच ‘View Once’ हे खास फिचर Beta युजर्ससाठी लॉन्च केले होते. त्यानंतर आता अजून एक नवं फिचर लॉन्च करण्याची घोषणा व्हॉट्सअॅपने केली आहे. यामध्ये एखाद्याला व्हिडिओ पाठवताना तुम्ही व्हिडिओची क्वॉलिटी निवडू शकता. हे नवं व्हिडिओ अपलो़ क्वॉलिटी फिचर WABetaInfo यांनी शोधले असून अजून युजरसाठी अॅक्टीव्ह झालेले नाही. व्हॉट्सअॅपचा व्हिडिओ पाठवण्यापूर्वी व्हिडिओ क्वॉलिटी चुज केल्यामुळे तुमची बँडविथ आणि व्हिडिओचे कम्प्रेशन सुद्धा वाचू शकते, असे XDA च्या डेव्हलपर्सचे म्हणणे आहे.

यासाठी तुम्हाला डेटा सेव्हर मोड निवडावा लागेल. त्यामुळे व्हिडिओ कम्प्रेस होऊन तुमच्या कमीत कमी डेटाचा वापर होईल. व्हिडिओ कॉलसाठी डेटा सेव्हर ऑप्शन व्हॉट्सअॅपने काही वर्षांपूर्वी लॉन्च केले होते. त्यामुळे बऱ्याच काळापासून या नव्या फिचरची युजर्संना प्रतिक्षा  होती.

कंपनीने मागे लॉन्च केलेल्या ‘View Once’ या फिचरमुळे फोटोज आणि व्हिडिओज एकदाच बघून डिलीट होऊ शकतात. हे फिचर अॅनरॉईडच्या बिटा टेस्टरसाठी लॉन्च झाले आहे. हे नवं फिचर लवकरच व्हॉट्सअॅपमध्ये लॉन्च करण्यात येईल, अशी शाश्वती कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि विल कॅथकार्ट यांनी WABetaInfo ला दिली आहे. ‘View Once’ वापरुन पाठवलेले फोटोज, व्हिडिओज समोरील व्यक्तीने बघितल्यास तुम्हाला नोटीफिकेशन येईल आणि ते फोटोज, व्हिडिओज चॅटमधून निघून जातील. (WhatsApp ‘View Once’ फिचर Beta युजर्ससाठी लवकरच होणार उपलब्ध; पहा काय आहे खासियत)

दरम्यान, Read Receipts म्हणजेच ब्लु टिक डिसेबल केले असेल तर View Once सेट करुन पाठवलेले फोटोज किंवा व्हिडिओज समोरील व्यक्तीने पाहिले की नाही, हे तुम्हाला कळणार नाही. परंतु, तुम्हाला आलेले फोटोज किंवा व्हिडिओज तुम्ही पाहिलेत हे समोरील व्यक्तीस कळेल.