WhatsApp Update: आता विना सिक्युरिटी कोड तुम्हाला तुमचं व्हॉट्सअॅप उघडता येणार नाही, जाणून घ्या काय आहे व्हॉट्सअपचा नवा अपडेट
व्हॉट्सअपच्या या नव्या फिचरनुसार तुम्ही एक व्हॉट्सअप अकाउंट आता दोन सहजरित्या दोन स्मार्टफोन्समध्ये वापरु शकणार आहे.
व्हॉट्सअॅप कायमचं आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन अपडेट घेवून येताना दिसतो. पण यावेळी व्हॉट्सअॅप घेवून आलेला नवा अपडेट तुम्हाला जरा वेगळा वाटू शकतो पण तुम्ही, तुमचं व्हॉट्सअप आणि तुमचा डेटा प्रायवेट ठेवण्यासाठीचं व्हॉट्सअप कडून हा नवा फिचर लॉंच करण्यात आला आहे. व्हॉट्सअपच्या या नव्या फिचरनुसार तुम्ही एक व्हॉट्सअप अकाउंट आता दोन सहजरित्या दोन स्मार्टफोन्समध्ये वापरु शकणार आहे. हो म्हणजेच काही व्हॉट्सअप वापरकर्त्यांचा फोन सिंगल सिम (Single Sim) असतो त्यामुळे दोन फोन नंबर वापरण्यासाठी त्यांना दोन मोबाईल (2 Mobile) हाताळणं आवश्यक असतं. पण यावेळी तुमच्या एका नंबरवर अॅक्टीव्ह (Active) असलेलं व्हॉट्सअप तुम्हाला दुसऱ्या फोनमध्ये वापरता येत नाही. कधी फोनची बॅटरी डिसचार्ज (Mobile Battery Discharge) झाली किंवा फोन खराब झाला अश्यावेळी तुमचचं व्हॉट्स अप तुम्हाला तुमच्या स्पेअर फोनमध्ये (Spare Phone) सुरु करता येत नाही त्यासाठीचं व्हॉट्सअॅप (New Whats App Update) हा नवा अपडेट घेवून आला हे ज्यानुसार तुम्ही तुमचं व्हॉट्सअप सहज तुमच्या दुसऱ्या अनड्रॉइड फोनमध्ये वापरु शकता.
पण तुम्हाला व्हॉट्सअप दुसऱ्या फोनमध्ये वापरत असताना तुमच्या प्रिवसीसाठी म्हणून एक सिक्युरिटी कोड दिल्या जाणार आहे. हा सिक्युरिटी कोड ओटीपी प्रमाणे असणार आहे. ज्याप्रमाणे तुम्ही एकाद बॅकेचं ट्रान्जेक्शन केल्यावर तुम्हाला ओटीपी येतो, ओटीपी म्हणजे वन टाईम पासवर्ड म्हणजे एकदाचं एका कामासाठी वापरता येईल असा कोड. असाच कोड आता व्हॉट्सअप देखील तुमच्या फोनवर शेअर करणार आहे. म्हणजेचं तुम्ही दुसऱ्या फोनमध्ये व्हॉट्स अप वापरत असताना, ते सुरु करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या मुख्य फोनवरती एक कोड सेंड करण्यात येईल तो योग्य कोड तुम्ही तुमच्या दुसऱ्या फोनमध्ये टाकल्यास तुमचं व्हॉट्सअ त्या फोनमध्ये सुरु होईल. (हे ही वाचा:-WhatsApp Banned Indian Accounts: यूजर्सच्या सुरक्षेबाबत व्हॉट्सअॅपची मोठी कारवाई; 37 लाख खात्यांवर घातली बंदी)
व्हॉट्सअप वापरकर्त्याच्या प्रायवसीसाठी हा सिक्युरिटी कोड व्हॉट्सअप कडून देण्यात येणार आहे. तरी या नव्या फिचरनुसार वापरकर्त्यांना त्यांचे व्हॉट्सअॅप अकाउंट एका स्मार्टफोनवरून दुसऱ्या स्मार्टफोनशी सहज लिंक करता येईल. म्हणजेचं तुम्ही तुमच्या फोनवर व्हॉट्स अप ऑपरेट करता त्याच प्रमाणे तुम्हाला दुसऱ्या फओनवर देखील व्हॉट्सअप ऑपरेट करता येईल. शिवाय दुसऱ्या फोनमध्ये व्हॉट्सअप वापरताना तुमचा सगळा डेटा तुमच्या नव्या फओनवर बॅकअप होईल त्यामुळे तुमचा कुठल्ही प्रकारचा डेटा गमवण्याची भिती नसेल तसेच तो डेटा सहज हाताळण्याची तुम्हाला मुभा असेल.