Twitter New Update: तुम्ही तुमच्या ट्वीटर अकाउंटमध्ये 'हे' बदल केल्यास कायमची गमवावी लागेल ब्लू टीक तर आता ट्वीटर कंटेंट होणार मॉनिटाईज, एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय
तसेच ट्वीटरवरील कंटेंट देखील मॉनिटाईज होईल अशी माहिती ट्वीटरचे नवे मालक मस्क यांनी दिली आहे.
गेल्या आठवड्यातचं एलॉन मस्क (Elon Musk) ट्वीटरचे सर्वोसर्वे माल झालेत. तेव्हापासून ट्वीटर या मायक्रोब्लॉगिंग साईटवर (Microblogging Site) मोठे बदल बघायला मिळालेत. ट्वीटर मधील नवनवीन अपडेट्स असो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या किंवा ट्वीटरची कार्यालये याबाबत एलॉन मस्क रोज काहीतरी नवीन निर्णय घेताना दिसतात. तरी तुम्ही ट्वीटर वापरकर्ते (iPhone User) असाल तर हो ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आता ट्वीटर वापरण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहे. यापूर्वी ट्वीटर ही मायक्रोब्लॉंगिंग साईट संपूर्ण जगभरात निशुल्क वापरता येत होती पण ट्विटर ब्लू'साठी (Twitter Blue) म्हणजेचं व्हेरिफाईड ट्वीटर अकाउंट (Verified Twitter Account) वापरकर्त्यांना हे अकाउंट वापरण्यासाठी ट्वीटरचं विशेष सबस्क्रीपशन (Subscription) घ्यावं लागणार आहे. तर यासाठी $8/महिना किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे. अशी निर्णय एलॉन मस्क कडून घेण्यात आला होता. पण $8/महिना ही पूरे नाही तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये हा बदल केल्यास पैसे देवूनही तुम्हाला तुमची ब्लू टीक कायमची गमवावी लागणार आहे.
एलॉन मस्क यांनी सांगितलं आहे की, ट्विटर अकाऊंटवर तुमचं नाव किंवा ओळख बदलल्यास म्हणजेच तुमचं नाव एडिट केल्यास व्हेरिफाईट युजरची (Twitter Verified User ) ब्लू टिक ( Blue Tick ) तुमच्या अकाउंटवरुन काढून टाकण्यात येईल आणि तुमचं अकाउंट व्हेरिफाइड राहणार नाही. पॅरोडी अकाउंट टाळण्यासाठी हा नवा बदल करण्यात येणार असल्याचं मस्क यांनी सांगितलं. पण तुम्हालाचं कधी प्रसंगावधनी तुमचं ट्वीटरवरचं नाव बदलावसं वाटलं किंवा कालांतराने तुमचं नीक नेम वापरावसं वाटल्यास तुम्हाला तुमच्या अकाउंटचा $8/महिन्याचा ब्लू अकाउंट कायमचा बदलावा लागणार आहे. (हे ही वाचा:- Twitter Subscription: आयफोन युजर्सला आता ट्वीटर वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे, 'ट्विटर ब्लू'साठी iOS वापरकर्त्यांना $8/महिना सबस्क्रिप्शन चार्ज)
तसेच ट्वीटरच्या आणखी एका नव्या अपडेटची घोषणा मस्क यांनी केली आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट अशी ट्वीटरची ओळख आहे पण आता तुम्हाला ट्वीटरवर देखील लांब कंटेंच लिहण्याची मुभआ मिळणार आहे. तसेच आता यूट्यूब आणि फेसबूक कंटेंट प्रमाणेच तुम्ही ट्वीटरच्या माध्यमातून देखील पैसे कमावू शकणार आहत कारण आता ट्वीटरवरील कंटेंट देखील मॉनिटाईज होईल अशी माहिती ट्वीटरचे नवे मालक मस्क यांनी दिली आहे.