Chandrayaan 2 ने धाडलेली पृथ्वीची झलक ISRO ने केली शेअर, तुम्ही पाहिलंत का? (See Photos)
यानंतर आज 'चांद्रयान 2' ने पृथ्वीच्या चौथ्या कक्षेत प्रवेश केला आहे. मिशन पुढे जाण्याआधी या चांद्रयाननं पहिल्यांदा पृथ्वीचे काही खास फोटो पाठवले आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) महत्वाकांक्षी चांद्रयान 2 (Chandryaan 2) या मोहिमेने उड्डाण 22 जुलै रोजी अवकाशात यशस्वीरीत्या झेप घेतली. यानंतर आज 'चांद्रयान 2' ने पृथ्वीच्या चौथ्या कक्षेत प्रवेश केला आहे. मिशन पुढे जाण्याआधी या चांद्रयाननं पहिल्यांदा पृथ्वीचे काही खास फोटो पाठवले आहेत. इस्रोनं हे फोटो ट्विटरवर शेअर करत याबाबत माहिती दिली. पृथ्वीचे हे फोटो चांद्रयान 2 मधील लँडर विक्रम मध्ये बसवलेल्या एलइ 4 या कॅमेऱ्याने टिपल्याचे सांगण्यात आले आहे.
पहा हे काही खास फोटो
आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटाच्या इस्त्रोने शक्तिशाली रॉकेट जीएसएलवी-मार्क III-एम1 द्वारे चांद्रयान-2 चे प्रक्षेपण करण्यात आले होते.पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये साधारण 3 लाख 84 हजार किलोमीटरचे अंतर आहे. हे अंतर पार करत भारताचे 6 सप्टेंबर रोजी नियंत्रित गतीने चंद्रावर उतरेल व त्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील परिस्थीचा आढावा घेणार आहे.सध्या कुठे असेल चांद्रयान 2 आणि कसे पोहचेल चंद्रावर?; जाणून घ्या ISRO च्या या उपग्रहाचे मार्गक्रमण (Video)
दरम्यान, इस्रोच्या माहिती नुसार 29 जुलै रोजी चंद्राने पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत यशस्वीरीत्या प्रवेश केला होता, 14 ऑगस्ट रोजी चांद्रयान 2 पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. यावेळी प्रोपेलिंग यंत्रणेचा वापर करून चंद्राच्या पहिल्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी चांद्रयान 2 ची गती कमी करण्यात येईल.
चांद्रयान 2 च्या यशानंतर यापुढील इस्रोचे मिशन हे सूर्यावरील असेल. या मिशनचे नाव आदित्य –एल1 (Aditya-L1)असून, 2020 मध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.