Telegram वर Fake कोविड-19 लस सर्टिफिकेटची विक्री- Report

याचाच फायदा घेत फेक सर्टिफिकेट्सची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. टेलिग्रामवर ही सर्टिफिकेट्स आणि टेस्ट रिपोर्ट्स 5,500 रुपयांना विकले जात असल्याचे समोर आले आहे.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोविड-19 संकट काळात (Covid 19 Pandemic) आता लसीकरण सर्टिफिकेटचे (Vaccination Certificate) महत्त्व वाढले आहे. याचाच फायदा घेत फेक सर्टिफिकेट्सची (Fake Certificates) विक्री होत असल्याचे समोर आले आहे. टेलिग्राम (Telegram) वर ही सर्टिफिकेट्स आणि टेस्ट रिपोर्ट्स 5,500 रुपयांना विकले जात असल्याचे समोर आले आहे. चेक पॉईंट रिसर्च च्या रिपोर्टनुसार, फेक सर्टिफिकेट्सचा काळाबाजर जगभरात पसरला आहे. यात भारत, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, सिंगापूर् आणि थायलॅंड या देशांचा समावेश आहे.

मार्च महिन्यापासून तब्बल 5,500 टेलिग्राम ग्रुप्स फेक सर्टिफिकेट्सची विक्री करत असल्याचे CPR ने म्हटले आहे. डार्कनेटच्या तुलनेत टेलीग्रामवर जाहिरात करणे आणि व्यवसाय करणे हे कमी तांत्रिक आहे. ते  लोकांपर्यंत वेगाने पोहोचू शकतात. यामुळे विक्रेते यावर जाहीरात करण्यावर भर देतात, असे Oded Vanunu, Head of Products, Vulnerability Research Check Point Software Technologies यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

डेल्टा वेरिएंटचा मोठ्या प्रमाणावर वाढणारा संसर्ग आणि लसीकरणाची आवश्यकता यामुळे फेक सर्टिफिकेटचा बाजार फोफावत आहे. मात्र असेही काही लोक आहेत ज्यांना लसीकरणानंतर मिळणारे स्वतंत्र नको आहे.

भारतात विविध राज्य सरकारांनी विषाणूचा पुढील प्रसार कमी करण्यासाठी रस्ते किंवा हवाई मार्गाने आंतरराज्य प्रवास करणाऱ्यांसाठी काही नियम बंधनकारक केले आहेत. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड इत्यादी राज्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवाशांना नकारात्मक कोविड -19 चाचणी निकाल (आरटी-पीसीआर अहवाल) किंवा लसीकरण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. दरम्यान, देशातील काही राज्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला.

मार्च 2021 पासून, बनावट लसीकरण सर्टिफिकेट्सच्या किंमती निम्म्याने कमी झाल्या आहेत आणि या फसव्या कोरोना व्हायरस सेवांसाठी ऑनलाईन ग्रुप्संना लाखो लोक फॉलो करतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif