बाईकस्वारांसाठी खुशखबर! BluSnap2 हेल्मेट डिव्हाईस उन्हाळ्यातही देईल एसीचा गारवा
त्यात जर बाईकवरुन प्रवास करताना हेल्मेट घालण्याची वेळ आली तर जीव अगदी नकोसा होतो.
वाढत्या उन्हामुळे आधीच जीवाची लाहीलाही होत आहे. त्यात जर बाईकवरुन प्रवास करताना हेल्मेट घालण्याची वेळ आली तर जीव अगदी नकोसा होतो. पण उन्हाळ्यात हेल्मेट घालणे सुसह्य व्हावे यासाठी एक खास डिव्हाईस बनवण्यात आले आहे. यामुळे हेल्मेट घालूनही तुम्हाला घाम येणार नाही. गरम जाणवणार नाही आणि डोके एकदम कूल राहील. हे युनिक डिव्हाईस उन्हाळ्याच्या हंगामात अतिशय उपयुक्त ठरेल.
BluSnap2 असे या डिव्हाईसचे नाव असून बंगळुरुच्या AptEner Mechatronics या कंपनीने हे डिव्हाईस बनवले आहे. यात अनेक चांगले फिचर्स आहेत. हे हेल्मेट मध्ये लावल्याने फक्त गरमीपासूनच नाही तर प्रदूषणापासूनही तुमचा बचाव होईल. याचे कारण म्हणजे यात असलेला एअर फिल्टर. यापूर्वी देखील AptEner Mechatronics कंपनीने हे डिव्हाईस बनवले होते. आता कंपनीने याचे अपडेटेड व्हर्जन लॉन्च केले आहे.
या डिव्हाईसच्या फ्रंट साईटला एक फॅन लावण्यात आला आहे. त्यामुळे गरम हवा खेचून फिल्टर आणि थंड होते. त्यानंतर ती हेल्मेटमध्ये सोडण्यात येते. त्यामुळे खूप अधिक उन्हातही हेल्मेट घालणे सोपे होते. या डिव्हाईसमध्ये तुम्ही पाणीही घालू शकता. फॅनच्या आत असलेल्या फोममुळे पाणी अधिक काळ टिकून राहतं.
पहा व्हिडिओ:
विशेष म्हणजे हे डिव्हाईस 10 सेकंदात हेल्मेट थंड करतं. बॅटरीवर चालणारे या डिव्हाईसमुळे उन्हाळ्यातही हेल्मेट घालणे सुसह्य होईल. या डिव्हाईसची किंमत 2299 रुपये आहे.