मंगळवार, सप्टेंबर 08, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Xiaomi Skynomad N70 Photos: एका चार्जमध्ये मुंबई ते थेट दिल्ली? शाओमीची 1461 किमी धावणारी नवी SUV बाजारात; भारतात प्रवेशाबाबत पुष्टी नाही | Pune MHADA Lottery Income Proof: 15 सप्टेंबरच्या मुदतीपूर्वी म्हाडाचा अर्जदारांना अनपेक्षित दिलासा; उत्पन्नाच्या दाखल्याची 'ती' सक्ती अखेर रद्द | महाराष्ट्र शेतमाल तारण कर्ज योजना: गोदामात माल ठेवून शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के कर्ज, 6 टक्के व्याजदर |

IND W vs NZ W 2nd ODI 2024 Live Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरी मॅच उद्या होणार, थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा घेणार आनंद घ्या जाणून

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण Sports18 चॅनेलवर उपलब्ध असेल. तर लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना येथून सामन्याचा आनंद घेता येईल.

IND W vs NZ W 2nd ODI 2024 Live Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरी मॅच उद्या होणार, थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा घेणार आनंद घ्या जाणून
IND W vs NZ W (Photo Credit - X)

Indian Women National Cricket Team vs New Zealand Women National Cricket Team:  भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज, रविवारी, 27 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणार आहे. टी-20 विश्वचषक 2024 मधील खराब कामगिरीनंतर भारतीय महिला संघाला चांगली कामगिरी करायची आहे. पहिल्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. विकेटकीपर फलंदाज रिचा घोषला संघात स्थान देण्यात आलेले नाही कारण ती बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत आहे. अशा स्थितीत यस्तिका भाटियाकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी असेल. दुसरीकडे, न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ यूएईमध्ये टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास चांगलाचा वाढला आहे.  (हेही वाचा  -  IND W vs NZ W 1st ODI Scorecard: टीम इंडियाने पहिल्या वनडेत न्यूझीलंडचा 59 धावांनी केला पराभव, राधा यादव ठरली गेम चेंजर; येथे पाहा स्कोरकार्ड)

किती वाजता सुरु होणार सामना?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना गुरुवार, 27 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता खेळवला जाईल.

कधी अन् कुठे पाहणार सामना?

दोन्ही संघांची खेळाडू

भारतीय महिला संघ: स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, डेलन हेमलता, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), श्रेयंका पाटील, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग, अरुंधती रेड्डी, तेजल हसबनीस, सायली सातघरे, सायमा ठाकोर, उमा छेत्री, प्रिया मिश्रा

न्यूझीलंड महिला संघ: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), लॉरेन डाउन, पॉली इंग्लिस, फ्रॅन जोनास, ली ताहुहू, हन्ना रो, जेस केर, मॉली पेनफोल्ड, ईडन कार्सन

(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2024 06:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

Close
Latestly whatsapp channel