DC vs KXIP, IPL 2019: विजय आणि हॅटट्रिकचा आनंद सेलिब्रेट करताना सॅम करन-प्रिती झिंटा यांचा मैदानातच भांगडा (Watch Video)

काल मोहाली येथील पीसीएस स्टेडिअमवर रंगलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब या सामन्यात पंजाबने दिल्लीवर 14 धावांनी विजय मिळवला.

Preity Zinta & Sam Curran (Photo Credits: Twitter)

काल (1 एप्रिल) मोहाली येथील आय.एस. बिंद्रा स्टेडियमवर रंगलेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) या सामन्यात पंजाबने दिल्लीवर 14 धावांनी विजय मिळवला. या विजयात वेगवान गोलंदाज सॅम करन (Sam Curran) याच्या हॅटट्रिकचा मोठा वाटा होता. या हॅटट्रिक आणि विजयाचा आनंद सॅम करन आणि पंजाब संघाची मालकीण प्रिती झिंटा (Preity Zinta) यांनी खास पद्धतीने साजरा केला. मैदानातच भांगडा करत एकमेकांना अलिंगन देत तिने प्रितीने करनसोबत आनंद व्यक्त केला. या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ:

 

नाणेफेक जिंकत प्रथम दिल्ली कॅपिटल्स गोलंदाजीसाठी मैदानात उतरले. पंजाबने 20 ओव्हरमध्ये दिल्लीपुढे 167 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करत मैदानात उतरलेल्या दिल्लीचा डाव मात्र पंजाबने 152 धावांत गुंडाळला. सॅम करनने 14 चेंडूत 11 धावा देत 4 गडी बाद केले. त्यामुळे त्यालाच सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या विजयाचा आनंद सॅम करन आणि प्रिती झिंटा यांनी मैदानातच साजरा केला.