BCCI कडून खेल रत्न पुरस्कारासाठी Mithali Raj, रविचंद्रन अश्विनच्या नावाची शिफारस, या 3 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी केले नामांकित

तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह सलामीवीर शिखर धवन, केएल राहुल यांना अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे.

मिताली राज आणि आर अश्विन (Photo Credit: Instagram)

National Sports Awards 2021: एएनआयनुसार भारतीय स्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या (Mithali Raj) नावांची बुधवारी बीसीसीआयने (BCCI) खेलरत्न पुरस्कारासाठी (Khel Ratna Award) क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस केली आहे. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह (Jasprit Bumrah) सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan), केएल राहुल (KL Rahul) यांना अर्जुन पुरस्कारासाठी (Arjuna Awards) नामांकित करण्यात आले आहे. “आमची सविस्तर चर्चा झाली आणि अश्विन व महिला कसोटी व एकदिवसीय कर्णधार मिताली यांचे नाव खेलरत्न पुरस्कारासाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही अर्जुनसाठी पुन्हा धवनची शिफारस करत आहोत तर राहुल आणि बुमराह यांचीही नावे सुचवतो,” बीसीसीआयच्या एका सूत्राने ANI ला सांगितले. (Rajiv Gandhi Khel Ratna Award: खेल रत्नसाठी ओडिशा सरकारकडून Dutee Chand तर ध्यानचंद पुरस्कारासाठी अनुराधा बिस्वालची शिफारस)

यापूर्वी युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 जून, 2021 पासून 5 जुलै, 2021 पर्यंत वाढवली होती. दरम्यान, मिताली राजला पुरस्कार जाहीर झाल्यास खेळातील सर्वोच्च सन्मान मिळवणारी ती पहिला महिला क्रिकेटर ठरेल. आतापर्यंत सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, कोणत्याही महिला क्रिकेटपटूला आजवर हा सन्मान मिळालेला नाही. खेल रत्न हा भारताचा सर्वोच्च क्रिडा सन्मान आहे. मिताली देशाची एक आघाडीची रन-स्कोरर आहे आणि खेळतील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. आपल्या कारकीर्दीत तिने आतापर्यंत 11 कसोटी, 215 वनडे आणि 89 टी -20 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने आठ शतके आणि 77 अर्धशतकांसह सर्व प्रकारात एकत्रित 10,203 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, अश्विन त्याच्या पिढीतल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजींपैकी एक आहे. अश्विनने आतापर्यंत 79 टेस्ट, 111 वनडे आणि 46 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. त्याने तीनही स्वरूपात एकत्रितपणे 615 विकेट्स घेतल्या आहेत.

लक्षात घेण्यासारखे म्हणजे मागील वर्षी भारतीय फलंदाजी रोहित शर्मा, पॅडलर मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगाट आणि भारतीय संघाची हॉकी कर्णधार राणी रामपाल आणि पॅरालंपियन मारियाप्पन थांगवेलु यांना खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारतीय क्रीडा इतिहासात पाच खेळाडूंना एकाच वर्षी खेलरत्न देण्याचीही पहिलीच वेळ होती.