Abraham Lincoln Statue: अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा पुतळा उष्णतेमुळे वितळला, पाहा व्हायरल
अमेरिकेतही उष्णतेची लाट कायम असून, त्याचा परिणाम स्थानिक लोकांवरच नाही तर मेणापासून बनवलेल्या पुतळ्यांवरही होताना दिसत आहे.
Abraham Lincoln Statue: भारताच्या बहुतांश भागांसह अनेक देशांमध्ये तीव्र उष्णता असून त्यामुळे नागरिकांची अवस्था दयनीय झाली आहे. अमेरिकेतही उष्णतेची लाट कायम असून, त्याचा परिणाम स्थानिक लोकांवरच नाही तर मेणापासून बनवलेल्या पुतळ्यांवरही होताना दिसत आहे. अमेरिकेतील उष्णतेमुळे अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा पुतळा वितळला आहे. त्यांच्या 6 फूट उंच मेणाच्या पुतळ्याचे वरचे टोक वितळून खाली कोसळले असून मानाचा संपूर्ण भाग खाली वाकला आहे. या मोकळ्या हवेत असलेल्या मेणाच्या पुतळ्याचे खराब झालेले डोके सध्या दुरुस्त केले जात आहे.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)