Hotline For Male Sex Abuse Victims: जपान सुरु करणार लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पुरुषांसाठी हॉटलाइन; Boyband Scandal नंतर सरकारचा मोठा निर्णय

आता जपानी सरकार लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या पुरुषांसाठी हॉटलाइन तयार करणार आहे. एका मंत्र्याने मंगळवारी याबाबत माहिती दिली.

Hotline For Male Sex Abuse Victims

काही महिन्यांपूर्वी जपानमध्ये एका बॉय बँड निर्मात्यावर अनेक पुरुषांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यांचे म्हणणे होते की, निर्माता जॉनी किटागावाने अनेक दशकांपासून तरुण नर्तक आणि गायकांचे लैंगिक शोषण केले आहे. पिडीत लोकांना तो त्याच्या आलिशान घरात ठेवत असे, त्यांना रोख रक्कम आणि संभाव्य प्रसिद्धीची आश्वासने देत असे व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असे. जॉनी अँड असोसिएट्स ही कंपनी जपानच्या मनोरंजन उद्योगातील एक शक्तिशाली शक्ती आहे. टागावा याचे 2019 मध्ये वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले,

त्यानंतर आता जपानी सरकार लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या पुरुषांसाठी हॉटलाइन तयार करणार आहे. एका मंत्र्याने मंगळवारी याबाबत माहिती दिली. ही हॉटलाइन मुले आणि पुरुषांसाठी शुक्रवारपासून तीन महिन्यांसाठी उपलब्ध असेल. (हेही वाचा: Child Sex Abuse Images: चर्चच्या धर्मगुरूकडे आढळले बाल लैंगिक शोषणाचे 600 फोटोज; पोलिसांकडून अटक, गुन्हा दाखल)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement