IPL Auction 2025 Live

Rishabh Pant Tweet: अपघातानंतर ऋषभ पंतने केले पहिले ट्विट, आशीर्वादांसाठी मानले आभार

या कठीण काळात त्याला साथ दिल्याबद्दल ऋषभ पंतने चाहत्यांचे आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे आभार मानले आहेत.

Rishabh Pant (Photo Credit - ANI)

भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतने अपघातानंतर पहिले ट्विट केले आहे. या कठीण काळात त्याला साथ दिल्याबद्दल ऋषभ पंतने चाहत्यांचे आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे आभार मानले आहेत. पंत म्हणतो की त्याच्या पुनर्प्राप्तीचा मार्ग खुला झाला आहे आणि तो पुढील आव्हानासाठी सज्ज आहे. 30 डिसेंबर रोजी घरी परतत असताना ऋषभ पंतचा रुरकीजवळ अपघात झाला. त्यांची भरधाव वेगात असलेली कार दुभाजकावर आदळल्यानंतर लांबपर्यंत खेचत राहिली. यानंतर कारने पेट घेतला. मात्र, पंत वेळीच गाडीतून बाहेर आल्याने त्यांचा जीव वाचला. आता पंतने ट्विट करून आपल्या प्रकृतीबद्दल सांगितले आहे आणि मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. हेही वाचा पाकिस्तानचा कर्णधार Babar Azam अडकला हनी ट्रॅपमध्ये ? अश्लिल व्हिडीओ आणि फोटो व्हायरल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)