IPL 2024 Schedule: लोकसभा निवडणुकीचा आयपीएलवर कोणताही परिणाम नाही, 8 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार सामना

देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा आयपीएलच्या 17 व्या हंगामावर कोणताही परिणाम होणार नाही. आयपीएल 2024 चे सर्व सामने भारतातच खेळवले जातील.

Photo Credit - X

इंडियन प्रीमियर लीग सुरू झाली आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामातील सहावा सामना आज म्हणजेच 25 मार्च रोजी बेंगळुरूच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज संघ आमनेसामने येणार आहेत. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. दरम्यान, आयपीएलच्या संपूर्ण वेळापत्रकाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा आयपीएलच्या 17 व्या हंगामावर कोणताही परिणाम होणार नाही. आयपीएल 2024 चे सर्व सामने भारतातच खेळवले जातील. मात्र, आतापर्यंत केवळ 7 एप्रिलपर्यंतच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. आता आयपीएलच्या उर्वरित सामन्यांबाबत मोठी माहिती समोर आली आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार 8 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. या स्पर्धेच्या लीग टप्प्यातील शेवटचा सामना 19 मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. यानंतर एक दिवसाच्या विश्रांतीनंतर बाद फेरीचे सामने पुन्हा सुरू होतील. पहिला क्वालिफायर सामना 21 मे रोजी होणार आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now