Illegal Non-Veg Shops: नवनिर्वाचित भाजप आमदार Swami Balmukund Acharya Maharaj अॅक्शन मोडमध्ये; रस्त्यांवरील अवैध मांसाहारी दुकाने बंद करण्याचे दिले निर्देश, Watch Video

रस्त्याच्या कडेला लावलेल्या मांसाहारी गाड्या हटवण्याच्या सूचनाही ते अधिकाऱ्यांना करत आहेत.

Swami Balmukund Acharya Maharaj (PC - Twitter)

Illegal Non-Veg Shops: राजस्थानमधील जयपूरच्या हवामहल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून आमदार झालेले भाजपचे बालमुकुंद आचार्य (Swami Balmukund Acharya Maharaj) यांचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. व्हिडिओमध्ये बालमुकुंद आचार्य एका अधिकाऱ्याशी फोनवर बोलत आहेत आणि त्यांना सिल्व्हर मिंट रोडवरील खुलेआम नॉनव्हेज विकणारी दुकाने तातडीने हटवण्याच्या सूचना देत आहेत. बालमुकुंद आचार्य यांची कठोर वृत्ती व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. रस्त्याच्या कडेला लावलेल्या मांसाहारी गाड्या हटवण्याच्या सूचनाही ते अधिकाऱ्यांना करत आहेत. हवामहल विधानसभा जागेवर भाजपचे उमेदवार बालमुकुंद आचार्य यांनी काँग्रेसच्या आरआर तिवारी यांचा 974  मतांनी पराभव केला आहे. (हेही वाचा- PM Narendra Modi On BJP Win: आजच्या विजयाने 2024 च्या हॅटट्रीकची गँरटी दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदींने फुंकले लोकसभा निवडणूकाचे रणशिंग)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif