Viral Video: मंदिरात लक्ष्मी मातेचा आशिर्वाद घेत चोरांचा दानपेटीवर डल्ला, सोशल मिडीयावर व्हिडिओची जोरदार चर्चा
ही संपूर्ण घटना मंदिराच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असुन हा व्हिडीओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मंदिरात चोरी करणारे किंवा दानपेटी पळवणाऱ्या चोरांबद्दल तुम्ही अनेकदा ऐकल असेल. पण जबलपूराच्या (Jabalpur) लक्ष्मी मातेच्या (Laxmi Temple) मंदिरात अजब घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. लक्ष्मी मातेच्या मंदिरात डल्ला मारण्यासाठी दोन चोरांनी हळूच प्रवेश केला आणि त्यानंतर लक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक झालेत. लक्ष्मी मातेचा आशिर्वाद घेत चोरांनी मंदिरात चोरी केली. ही संपूर्ण घटना मंदिराच्या सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली असुन हा व्हिडीओ (Video) सोशल मिडियावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)