Chhatrapati Sambhaji Raje: छत्रपती संभाजीराजेंची मोठी घोषणा, महाराष्ट्राच्या परिवर्तन क्रांतीची करणार सुरूवात

महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात करण्याची घोषणा छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे.

Chhatrapati Sambhaji Raje: छत्रपती संभाजीराजेंची मोठी घोषणा, महाराष्ट्राच्या परिवर्तन क्रांतीची करणार सुरूवात
Sambhajiraje Chhatrapati | (Photo Credit - Social Media)

राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी मोठी घोषणा केली आहे. सध्या राज्याच्या राजकारणात कुठल्याही पदावर छत्रपती नसलेत तरी  छत्रपती संभाजीराजे राज्याच्या समाजकारणात कायम सक्रीय असतात. गडकिल्ले संवर्धनासाठी नुकतीच विशेष मागणी छत्रपतींनी शिंदे सरकारकडे (Shinde Government) केली होती. आता त्या पाठोपाठच महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात करण्याची घोषणा छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे. 9 ऑगस्ट म्हणजेच क्रांती दिनी तुळजापूरला महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात होणार असं सुचक ट्वीट (Tweet) छत्रपती संभाजी राजेंनी केलं आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2022 10:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).