Kasara Train Fire: कसाराजवळ नंदीग्राम एक्सप्रेसच्या डब्याला आग, प्रवाशांमध्ये घबराट (Watch Video)

या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Photo Credit = X

कसारा येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर ट्रेनमधील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. आगीची माहिती मिळताच कसाराजवळ गाडी थांबवण्यात आली. ही आग कशी लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या कॉम्प्रेसरला आग लागली. यानंतर ट्रेन थांबवण्यात आली. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवले. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)