मुंबईतील तलावांमधील आजची पाणी पातळी: पावसाच्या दांडीमुळे साठ्यात घट; एकूण साठा 88.88% वर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांतील पाणीसाठा ८८.८८ टक्क्यांवर पोहोचला असून, एकूण साठा १२ लाख ८६ हजार ४०३ दशलक्ष लिटर इतका नोंदवला गेला आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत साठ्यात किरकोळ चढ-उतार दिसून येत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील एकूण पाणीसाठा ८८.८८ टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाच्या ओढीमुळे जलाशयांच्या साठ्यात मोठी वाढ होण्याऐवजी तो जवळपास स्थिर पातळीवर राहिला आहे. गेल्या आठवडाभरात मुंबईच्या पाणीसाठ्यात मोठी झेप न दिसता संथ पण स्थिर हालचाल नोंदवली गेली आहे. सोमवारी हा साठा ९०.०६ टक्के इतका होता, मंगळवारी तो किंचित घसरून ८९.५४ टक्क्यांवर आला, तर बुधवारी ८८.९३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.  मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील साठा ८६ ते ८७ टक्क्यांच्या दरम्यान नोंदवला जात आहे, तर अप्पर वैतरणा जलाशयात साठा तुलनेने कमी म्हणजे सुमारे ७९ टक्के इतका आहे.

मुंबईतील तलावांमधील आजची पाणी पातळी

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement