Maharashtra Rain Update: मुंबईसह ठाण्यात अधिक पावसाची नोंद, खबरदारीचा उपाय म्हणून NDRF ची पथके शहरात तैनात
आज पहाटे मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने, शहरातील काही भागात पाणी साचले आणि जड वाहतुकीमुळे रहिवाशांची गैरसोय झाली.
आज पहाटे मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने, शहरातील काही भागात पाणी साचले आणि जड वाहतुकीमुळे रहिवाशांची गैरसोय झाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबई आणि त्याच्या उपनगरांसाठी मध्यम ते मुसळधार पाऊस आणि पुढील काही दिवसांत वेगळ्या ठिकाणी अत्यंत जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठाण्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान माथेरानपेक्षा मुंबईसह ठाण्यात आधिक पावसाची नोंद झाली आहे.