Goregaon Fire Incident: गोरेगाव च्या इमारतीला आग लागल्याच्या घटनेच्या 'त्या' रात्री काय घडलं? प्रत्यक्षदर्शी अभिनेते Manish Chaturvedi यांनी सांगितला हा घटनाक्रम!

लहान मुलं, तरूणी मदतीसाठी आक्रोश करत असल्याचंही त्यांनी पाहिलं होतं पण मदत देऊ शकत नव्हते. असे चतुर्देवी यांनी ANI शी बोलताना म्हणाले आहेत.

Mumbai Fire | Twitter

गोरेगाव च्या 'जय भवानी'इमारतीला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री रहिवासी गाढ झोपेत असताना ही आग लागल्याने अनेकांना त्याचा थांगपत्ताच नव्हता. दरम्यान या रात्री काय घडलं याची माहिती प्रत्यक्षदर्शी असलेल्या अभिनेते Manish Chaturvedi यांनी ANI शी बोलताना दिली आहे. 'जय भवानी' इमारतीच्या शेजारीच त्यांचीही इमारत आहे. ते रात्री उशिरा दीडच्या सुमारास पार्टीवरून आले. त्यानंतर अडीच तीन च्या सुमारास त्यांना काही जळत असल्याचा वास आला. घर पाहिलं तर ठीक होतं. नंतर त्यांनी खाली वाकून पाहिलं तर धूर झाला होता. दरम्यान त्यांनी अग्निशमन दलाला कॉल केला पण अपेक्षित मदत न मिळाल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लहान मुलं, तरूणी मदतीसाठी आक्रोश करत असल्याचंही त्यांनी पाहिलं होतं पण मदत देऊ शकत नव्हते.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement