Ahmednagar Train Caught fire Video: अगमदनगरहून निघालेल्या आष्टी रेल्वेला भीषण आग, सुमारे पाच डबे जळून खाक
अहमदनगरहून आष्टीच्या दिशेने जाणाऱ्या मध्य रेल्वेला मोठी आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, रेल्वेचे काही डबे आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. डीडी सह्याद्री या 'X' हँडलवरुन या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सुरुवातीला दोन डब्यांना आग लागली. त्यानंतर ती आग पुढच्या पाच डब्यांपर्यंत पोहोचली.
अहमदनगरहून आष्टीच्या दिशेने जाणाऱ्या मध्य रेल्वेला मोठी आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, रेल्वेचे काही डबे आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. डीडी सह्याद्री या 'X' हँडलवरुन या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सुरुवातीला दोन डब्यांना आग लागली. त्यानंतर ती आग पुढच्या पाच डब्यांपर्यंत पोहोचली. गाडीत प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. किंवा कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. आगीमध्ये एकूण गार्ड ब्रेक कोच आणि चार डबे असे एकूण पाच डब्यांना आग लागल्याचे समजते. दुपारी चार वाजणेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement