Andheri Subway Shut Amid Waterlogging: मुंबई संततधार पाऊस, पाणी साचल्याने अंधेरी सबवे बंद

दरम्यान, रस्त्यावर पाणी साचल्याने अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे.

Andheri Subway (PC - Twitter)

Andheri Subway Shut Amid Waterlogging: मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे.परिणामी पावसामुळे वाहतूक कोंडी, रस्त्यावर पाणी साचणे आणि लोकल गाड्यांना उशीर होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई तसेच इतर उपनगरांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. शुक्रवारी रात्री मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, रस्त्यावर पाणी साचल्याने अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. यासंदर्भात अंधेरी लोखंडवाला ओशिवरा नागरिक संघाने ट्विटरवर माहिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)