Arvind Kejriwal on CAA: 'भाजप आमच्या मुलांना नोकऱ्या देऊ शकत नाही, पण पाकिस्तानमधून येणाऱ्या मुलांना नोकऱ्या द्यायला तयार' - अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर (CAA) भाजपवर निशाणा साधला आहे.  सरकारला भारतात पाकिस्तानींचा बंदोबस्त करायचा आहे. म्हणून त्यांनी सीएए आणल्याचं, केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

Photo Credit - Twitter

Arvind Kejriwal on CAA: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal)यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की सीएएच्या माध्यमातून बांगलादेश ( Bangladesh), पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तान (Afghanistan)मधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व (Indian citizenship) दिले जाईल. म्हणजे त्यांना भारतात नोकऱ्या दिल्या जातील, त्यांच्यासाठी घरेही बांधली जातील. भाजप आमच्या मुलांना नोकऱ्या देऊ शकत नाही, पण पाकिस्तानातून येणाऱ्या मुलांना त्यांना नोकऱ्या (Job) द्यायच्या आहेत. आधीच आमचे बरेच लोक बेघर आहेत, पण भाजपला पाकिस्तानातून आलेल्या लोकांना इथे स्थायिक करून घ्यायचे आहे, त्यांचा विकास करायचा आहे. भारत सरकारचा पैसा आमच्या कुटुंबासाठी न वापरता पाकिस्तानींच्या बंदोबस्तासाठी वापरचा आहे. (हेही वाचा : Delhi CM Arvind Kejriwal 8 समन्सनंतर पहिल्यांदाच ED ला उत्तर देण्यास तयार; समोर ठेवली 'ही' अट)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement