Viral Video: आग्रा येथे हवाई दलाचे विमान कोसळले, दोन्ही वैमानिकांनी उडी मारून वाचवला जीव

विमान कोसळल्यानंतर विमानाला आग लागली. विमान जमिनीवर पडण्यापूर्वीच विमानात बसलेल्या दोन वैमानिकांनी उडी मारली. त्यामुळे दोघांचे प्राण वाचले. हवाई दलाचे एमआयजी-२९ विमान हवेतच कोसळले होते. यानंतर विमानात मोठा स्फोट झाला आणि त्यात आग लागली.

plane crash of Indian Air Force

Viral Video: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर विमानाला आग लागली. विमान जमिनीवर पडण्यापूर्वीच विमानात बसलेल्या दोन वैमानिकांनी उडी मारली. त्यामुळे दोघांचे प्राण वाचले. हवाई दलाचे एमआयजी-२९ विमान हवेतच कोसळले होते. यानंतर विमानात मोठा स्फोट झाला आणि त्यात आग लागली. हे विमान कागरौलच्या सोनिगा गावाजवळील रिकाम्या शेतात पडले. या लढाऊ विमानाने पंजाबमधील आदमपूर येथून उड्डाण केले होते. या घटनेनंतर आजूबाजूच्या गावातील लोकही ते पाहण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले.

येथे पाहा, व्हिडीओ 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)