Chhattisgarh: छत्तीसगड बिजापूरमध्ये आयईडी स्फोटात 2 पोलिस कर्मचारी जखमी

रविवारी छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये झालेल्या आयईडी स्फोटात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत, असे एएनआयने पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे.

Bomb Blast प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - फेसबुक)

बिजापूरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात एका चालकासह 9 जणांचा मृत्यू झाल्याची झाल्याची घटना घडली होती. यानंतर जवळपास एक आठवडा उलटला आहे. रविवारी छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये झालेल्या आयईडी स्फोटात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत, असे एएनआयने पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे. पोलिसांनी पुढे म्हटले आहे की, हा आयईडी स्फोट माओवाद्यांनी घडवून आणला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्रू पोलिस स्टेशन आणि जिल्हा राखीव गार्डचे पथक एरिया डोमिनेशन ड्युटी करत असताना ही घटना घडली.

घटनेत जखमी झालेल्या सर्वांवर बिजापूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि जखमी जवान धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement