Himachal Pradesh Earthquake: हिमाचल प्रदेश हादरले... चंबा येथे ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

हिमाचल प्रदेशमधील चंबा येथे गुरुवारी संध्याकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. 5.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप होता. ,सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

Earthquake

Himachal Pradesh Earthquake : हिमाचल प्रदेशमधील चंबा येथे गुरुवारी संध्याकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली. चंबा हे भुकंपाचे केंद्रबिंदू होते. चंबापासून 350 किलोमीटरहून अधिक अंतरावर असलेल्या मनाली आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांच्या मते, चंबा येथे रात्री ९.३४ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. (हेही वाचा : Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानात 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, अद्याप कोणत्याही जिवीतहानीचे वृत्त नाही )

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement