MPSC Exam Postponed: पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलली, नवी तारीख लवकरच जाहीर होणार

पुण्याच्या अहिल्याबाई लायब्ररी नवी पेठ येथील या आंदोलनामध्ये रोहित पवार देखील सहभागी होते त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिले होते.

MPSC Exam Update | X

25 ऑगस्ट दिवशी IBPS आणि MPSC ची परीक्षा एकत्र आल्याने स्पर्धा परीक्षा देणार्‍यांना एका परीक्षेवर पाणी सोडावं लागणार होतं. अशाप्रकारे परीक्षांच्या तारखांमधील संघर्ष टाळण्यासाठी अनेक विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. आज त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. एमपीएससी ने परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर होणार आहे असे एमपीएससी ने म्हटलं आहे. पुण्याच्या अहिल्याबाई लायब्ररी नवी पेठ येथील  या आंदोलनामध्ये रोहित पवार देखील सहभागी होते त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिले होते.

MPSC ची 25 ऑगस्टची परीक्षा गेली पुढे

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)