King : शाहरुख आणि लेक सुहाना खान दिसणार एकाच चित्रपटात; सिद्धार्थ आनंद यांच्या डॉनमध्ये साकारणार भूमिका

चित्रपटाची तयारी सध्या सुरू आहे.

Photo Credit - Instagram

King : पिंकवीलाच्या वृत्तानुसार शाहरुख खान मुलगी सुहाना खानसोबत किंग या त्याच्या नव्या चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपटाची तयारी सध्या सुरू आहे.

शाहरुखच्या डॉन चित्रपटांच्या सिरीज प्रेक्षकांच्या पंसतील उतरल्यानंतर आता शाहरूख (Shah Rukh Khan) किंग चित्रपटात दिसणार आहे. आधी किंग या चित्रपटाला डॉन 3 नाव देण्यात आले होते. चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भुमीकेत दिसणार होता. मात्र, आता चित्रपटात भरपूर बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता रणवीर सिंग डॉन ३ (Don 3) म्हणजेच किंगचा भाग राहिलेला नाही. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरूख बॉलिवूड सुपरस्टार किंग नावाच्या आगामी चित्रपटात डॉनची भूमिका साकारणार आहे. आगामी ॲक्शन थ्रिलरमध्ये त्याची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) देखील दिसणार आहे. किंग हा शाहरूखचा पॅशन प्रोजेक्ट आहे. सिद्धार्थ आनंद आणि सुजॉय घोष यांच्यासोबत तो या प्रोजेक्टच्या सर्व पैलूंवर बारकाईने काम करत आहे. (हेही वाचा : Shahid Kapoor : ‘तुम्ही हे थांबवाल का?’ शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत डेटवर असताना पापराझींची हजेरी; फोटो क्लिक करताच संतापला)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या