Shah Rukh Khan: सांगलीच्या तरुणांनी असं काही केलं की खुद्द बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने मानले आभार
अभिनेता शाहरुख खानच्या सांगलीतील चाहत्यांनी पठाण सिनेमासाठी अख्खं ऑडिटोरियम बुक केलं आहे. AskSRK असं लिहून आणि शाहरुखला टॅग करत हा फोटो शेअर केला असल्याने, शाहरुखपर्यंत हा फोटो पोहोचला आणि त्याने या चाहत्यांचे आभारही मानले.
तब्बल चार वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर बॉलिवूडचा बादशाह किंग खान मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. येत्या २५ जानेवारीला शाहरुखचा बहुचर्चित सिनेमा पठाण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अवघ्या तीन दिवसांनी शाहरुखचा पठाण मेगा स्क्रीन गाजवणार आहे. तरी अभिनेता शाहरुख खानच्या सांगलीतील चाहत्यांनी पठाण सिनेमासाठी अख्खं ऑडिटोरियम बुक केलं आहे. सांगलीतील Sangli SRK Universe या फॅनक्लबने ट्विटरवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी पठाणसाठी संपूर्ण ऑडिटोरियम बुक केल्याची माहिती दिली. AskSRK असं लिहून आणि शाहरुखला टॅग करत हा फोटो शेअर केला असल्याने, शाहरुखपर्यंत हा फोटो पोहोचला आणि त्याने या चाहत्यांचे आभारही मानले. शाहरुखने लिहिले की, 'धन्यवाद आणि आशा करतो की तुम्हाला चित्रपट आवडेल'.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)