Amitabh Bachchan Meets His Fans: बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या जलसा बंगल्याबाहेर घेतली चाहत्यांची भेट

अमिताभ बच्चन यांनी नेहमीच आपल्या चाहत्यांबद्दल आपुलकी व्यक्त केली आणि यावेळीही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या नम्रतेने सर्वांची मने जिंकली.

Amitabh Bachchan (फोटो सौजन्य - फेसबुक)

Amitabh Bachchan Meets His Fans: रविवारी, बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी त्यांच्या जलसा बंगल्याबाहेर मोठ्या संख्येने लोक जमले होते. बिग बींना त्यांच्या चाहत्यांची बातमी समजताच ते त्यांच्या बंगल्यातून बाहेर आले. अमिताभ बच्चन यांना पाहून त्यांचे चाहते खूश झाले आणि त्यांनी त्यांचे फोटो मोबाईलमध्ये टिपण्यास सुरुवात केली. बिग बी त्यांच्या जलसा बंगल्यातून बाहेर पडून चाहत्यांना भेटत आहेत. याचा व्हिडिओही समोर आला आहे.

अमिताभ बच्चन यांनी नेहमीच आपल्या चाहत्यांबद्दल आपुलकी व्यक्त केली आणि यावेळीही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या नम्रतेने सर्वांची मने जिंकली. चाहत्यांना पाहून बिग बींनी हस्तांदोलन करून त्यांचे स्वागत केले आणि काही वेळाने ते पुन्हा त्यांच्या बंगल्यात गेले.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement