मराठी कलाकारांनी अशा साकारल्या गणेश मूर्ती !

गणेशाचं रुप साकारताना मराठी कलाकार.

गणेशमुर्ती बनवताना अभिनेता (Photo Credit- Instagram)

वृंदावन, सविता दामोदर परांजपे या मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेला अभिनेता राकेश बापटची अजून एक कला समोर आली आहे. गणशोत्सवानिमित्त त्याने स्वतः गणेश मूर्ती बनवली आहे.
गणेश मूर्ती बनवण्याची कला त्याने स्वतः पूरती मर्यादीत न ठेवता त्याचे प्रशिक्षण त्याने अभिनेते करण वाही आणि हृत्विक धनजनी यांनाही दिलं.
मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णीने देखील गणरायाची मूर्ती साकारली. आपल्या भावासोबत तिने मूर्ती साकारण्याचा आनंद घेतला.
विविध भाषांमधील सिनेमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री मंजिरी फडणीस हिने देखील अगदी आत्मियतेने बाप्पाची मूर्ती साकारली.
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement