Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात येत्या 48 तासांत पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट जारी
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये 21 नोव्हेंबरला पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात (Maharashtra) पुढील दोन दिवस पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे. पूर्व-मध्य आणि पश्चिम-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसून येईल. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. IMD ने मच्छिमारांना 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात जाऊ नये असा सल्ला दिला आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.अरबी समुद्रातील वाऱ्यांचा प्रवाह पाहता प्रादेशिक हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाजही जारी केला आहे. हेही वाचा Mumbai: दहिसरमध्ये शेजाऱ्यांच्या प्रसंगवधानामुळे आत्महत्या करणाऱ्या महिलेला वाचवलं, निर्भया पथकाची कामगिरी
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये 21 नोव्हेंबरला पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. 22 नोव्हेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. पुढील 48 तासांतही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, केरळमध्ये मुसळधार पाऊस पडेल. इकडे महाराष्ट्राच्या शेजारील राज्य गोव्यातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील पावसामुळे आतापर्यंत रेल्वे वाहतुकीवर वाईट परिणाम झाला आहे.
अनेक भागात रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हावडा-यशवंतपूर दुरंतो एक्स्प्रेस, संत्रागाची-तिरुपती एक्स्प्रेस, हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा-तिरुचिरापल्ली एक्स्प्रेस आणि हातिया-यशवंतपूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.