BMC Water Supply: मुंबईत उद्या पाणीकपात; मालाड, गोरेगाव पश्चिम विभागातील 'या' भागांचा पाणीपुरवठा बंद
जलवाहिनीला गळती लागल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
BMC Water Supply: मालाड पश्चिम येथील 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती उद्भवल्याने मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम विभागातील काही भागांचा शनिवार, 25 जानेवारी 2025 रोजी पाणीपुरवठा बंद (Mumbai Water Supply)राहणार आहे. या गळती दुरुस्तीचे काम शुक्रवार, दिनांक 24 जानेवारी रोजी रात्री 10.30 ते शनिवार, दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेकडून(BMC) करण्यात आलं आहे.
या विभागात पाणीपुरवठा बंद
मालाड पश्चिम - अंबुजवाडी, आजमी नगर ,जनकल्याण नगर
गोरेगाव पश्चिम - उन्नत नगर, बांगुर नगर, शास्त्री नगर, मोतीलाल नगर, सिद्धार्थ नगर, जवाहर नगर, भगतसिंग नगर, राम मंदिर मार्ग
मालाड पश्चिमस्थित लिबर्टी जलबोगदा येथे 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती उद्भवल्याचे निदर्शनास आले आहे. गळती दुरुस्तीची कार्यवाही शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 रात्री 10.30 वाजता हाती घेण्यात येत आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे कामकाज शनिवार, दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालाड पश्चिम आणि गोरेगाव पश्चिम येथील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवार, दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी बंद राहणार आहे.
संबंधित परिसरातील नागरिकांनी, पाणी काटकसरीने वापरून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)