IPL Auction 2025 Live

New Year's Eve Celebrations: नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील 'हे' रस्ते राहणार बंद, जाणुन घ्या वाहतूक व्यवस्था

याशिवाय श्यामाप्रसाद मुखर्जी चौकाकडून गेट वे ऑफ इंडियाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

रहदारी (Archived images)

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत (Mumbai) थर्टी फर्स्ट नाईट (thirty first night) आणि न्यू इयर सेलिब्रेशनची (New Year Celebration) योजना आहे का? पण घरातून बाहेर पडण्यापूर्वी ट्रॅफिकमध्ये (Mumbai Traffic) झालेला बदल तुम्हाला माहीत आहे का? मुंबई वाहतूक पोलिसांनी अनेक रस्त्यांच्या वाहतुकीबाबत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. हे बदल 31 डिसेंबर 2022 रोजी रात्री 8 ते 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांंनी (Mumbai Traffic Police) ट्विट करून त्याची माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी 100 ठिकाणांची नाकेबंदी केली आहे. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

सर्व समुद्र किनाऱ्यांलगतचे रस्ते 'नो पार्किंग झोन' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. याशिवाय श्यामाप्रसाद मुखर्जी चौकाकडून गेट वे ऑफ इंडियाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मरीन ड्राईव्ह ते नेताजी सुभाषचंद्र रोड आणि प्रिन्सेस ट्रेड फ्लायओव्हरच्या उत्तरेकडे नरिमन पॉइंट मार्गे वाहतूकही बंद करण्यात आली आहे. हेही वाचा New Year Eve Sydney Harbour Bridge: नव्या वर्षाचं स्वागत करण्यास सिडनी सज्ज, २०२२ नववर्षाच्या पूर्वसंध्येला पहा ऑस्ट्रेलियातील सिडनी ब्रिजचा खास नजारा; Watch Video

पश्चिम मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, जुहू रोड, जुहू तारा रोड, वैकुंठलाल मेहता मार्ग, एसव्ही रोड अशा ठिकाणी नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आला आहे. स्वामी विवेकानंद रोडवर रामकृष्ण मिशन ते महिला मंडळ जंक्शनपर्यंत नो पार्किंग लागू आहे. मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांच्या आदेशाने ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना नो पार्किंग झोन बनवण्याचा उद्देश रस्त्यांवरील वाहतूक सोपी व शिस्तबद्धपणे व्हावी आणि पादचाऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून वाचवावे.

या आदेशात असे म्हटले आहे की, जुहू बीच, जुहू तारा रोड या भागात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक हॉटेल आणि पबमध्ये गर्दी करतात. त्यामुळे वाहतूक मंदावली असून, सर्वसामान्य नागरिकांना येथून ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथून वाहतूक सुरळीत व्हावी आणि कोठेही कोंडी होऊ नये, यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. हेही वाचा Maharashtra: 106 शेतकरी कुटुंबांना नवीन वर्षासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून नुकसान भरपाईचे पॅकेज जाहीर, आमदार महेश लांडगेंनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

त्याचप्रमाणे वार्षिक गर्दी लक्षात घेऊन मध्य मुंबईतील वरळी सी-फेस येथे नो-पार्किंग झोन तयार करण्यात आला आहे. वरळी सी-फेस चौपाटी, खान अब्दुल गफार मार्ग आदी भागात होणारी गर्दी आणि ठिकठिकाणी वाहनांच्या पार्किंगमुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासातून सुटका मिळावी, यासाठी हा आदेश काढण्यात आल्याचे या संबंधित आदेशात म्हटले आहे. आहे.