IPL Auction 2025 Live

हिंगणघाट ची पुनरावृत्ती! नाशिक मध्ये महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतुन जिवंत जाळण्याचा प्रयत्न; अज्ञात आरोपी फरार

आज, 15 फेब्रुवारी रोजी काही अज्ञात तरुणांकडून लासलगाव येथे बस स्थानकावर एका महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

हिंगणघाट (Hinghanghat)  जळीतकांडात एका महिला प्राध्यापिकेला भर दिवसा जाळल्याची घटना अगदी ताजी असताना अजूनही यावरून महाराष्ट्र सहित देशभरात उद्र्क पाहायला मिळत असताना. आता नाशिक (Nashik) येथील लासलगाव (Lasalgaon)  येथे देखील समान घटना आढळून आली आहे. आज, 15 फेब्रुवारी रोजी काही अज्ञात तरुणांकडून लासलगाव येथे बस स्थानकावर  एका महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि यांनतर हे अज्ञात आरोपी फरार झाले आहे. ही महिला विवाहित असून या घटनेमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. सध्या बसस्थानकातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी चार अज्ञात संशयितांचा शोध सुरू केला असून एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे.हिंगणघाट जळीतकांड पीडितेचा मृत्यू; सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर, चित्रा वाघ या महिला लोकप्रतिनिधींनी दिल्या संतप्त प्रतिक्रिया

या दुर्दैवी घटनेच्या साक्षीदार स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकावर एक विवाहित महिला रसवंतीगृहाजवळ बसची वाट पाहत होती. यावेळी चार जणांनी विवाहित महिलेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली असेल असा अंदाज आहे. दरम्यान, या दुर्देवी घटनेमध्ये महिला गंभीर भाजली आहे. सध्या तिला नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 'माझ्यामुळे सर्वांना त्रास होतोय तर, मला गोळी झाडून मारुन टाका' हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीची पोलिसांकडे मागणी 

संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ बसस्थानकावर धाव घेत सीसीटीव्हीच्या फूटेजच्या आधारे तपासाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या काळात नाशिक दौऱ्यावर येणार असल्याने त्यापूर्वीच ही गंभीर दुर्देवी घटना घडल्यामुळे पोलिसांनी जातीने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.