Mumbai Local Mega Block Update: आज मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, लोकल प्रवास करण्यापूर्वी पहा वेळापत्रक
मुंबई लोकल मार्गावरील मध्य आणि हार्बर मार्गावर देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे तरी मध्य आणि हार्बर रेल्वेकडून आजसाठीचं सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
आज मुंबई लोकलने प्रवास करण्याचा विचार करत आहात, मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. मुंबई लोकल मार्गावरील मध्य आणि हार्बर मार्गावर देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे तरी मध्य आणि हार्बर रेल्वेकडून आजसाठीचं सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. देखभालीचे काम, रुळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी आणि सिग्नल यंत्रणेतील विविध कामासाठी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तरी हा मेगाब्लॉक फक्त मध्य आणि हार्बर मार्गावर असणार आहे. म्हणू कल्याण-डोंबिवली, कसारा, बदलापूर, कर्जत किंवा पनवेल, नवी मुंबईच्या बाजून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या मेगाब्लॉकचा फटका बसणार आहे. पण पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र कुठल्याही प्रकारचा मेगाब्लॉक घेण्यात आला नसल्याने पश्चिम मार्गावरील म्हणजे वसई-विरारा ते चर्चगेट दरम्यान प्रवास करणाऱ्यांना लोकल प्रवाशांना ठरलेल्या वेळापत्रकानुसार प्रवास करता येणार आहे.
गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा आज बंद असेल. तर पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द असेल. (हे ही वाचा:- Mumbai Local Mega Block: पुन्हा एका ब्रिज बांधकामासाठी मुंबई लोकलचा जंबो मेगाब्लॉक, जाणून घ्या कधी आणि कुठल्या मार्गावर असेल मेगाब्लॉक)
ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. तर माटुंगा स्टेशननंतर धीम्या मार्गावर वळवण्यात आलेली अप जलद मार्गावर सेवा पुन्हा वळवण्यात येतील. रोजच्या नियोजित वेळेच्या ऐवजी आज मध्य मार्गावरील लोकल सेवा 15 मिनिटे उशिराने धावेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहे. मध्य मार्गावरील सेवा १५ मिनिटे उशीराने धावतील.