'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाच्या निषेधार्थ उद्या मुंबई मध्ये टिळक भवनात काँग्रेसचे आंदोलन; बाळासाहेब थोरात यांची माहिती

आज के शिवाजी नरेंद्र मोदी (Aaj Ke Shivaji Narendra Modi) या पुस्तकाच्या विरोधात काँग्रेस (Congress) तर्फे उद्या, 14 जानेवारी रोजी सकाळी ठीक 11 वाजल्यापासून मुंबईतील टिळक भवन (Tilak Bhavan) येथून निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे, याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी माहिती दिली

Balasaheb Thorat | (Photo credit : facebook)

आज के शिवाजी नरेंद्र मोदी (Aaj Ke Shivaji Narendra Modi) या पुस्तकातून छत्रपती शिवरायांची (Chatrapati Shivaji Maharaj) तुलना करून करण्यात आलेल्या अपमानाच्या विरोधात काँग्रेस (Congress) तर्फे उद्या, 14 जानेवारी रोजी सकाळी ठीक 11 वाजल्यापासून मुंबईतील टिळक भवन (Tilak Bhavan) येथून निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे, याबाबत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी माहिती दिली.  छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे पूज्य दैवत आलेत आणि महाराष्ट्रासाठी प्रेरणास्रोत आहेत. छत्रपतींच्या नावावर मत मागणारी भाजपा (BJP) आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची तुलना शिवाजी महाराजांशी करीत आहे. पूर्वीही अशी तुलना अजय कुमार बिष्ट (Kumar Bisht) आणि विजय गोयल (Vijay Goyal) यांनी केली होती.वारंवार होणाऱ्या अपमानाचा विरोध म्हणून हे पाऊल उचलत असल्याचे देखील थोरात यांनी माध्यमांना सांगितले. हा प्रकार न थांबल्यास लवकरच राज्यव्यापी आंदोलन पुकारण्याचा इशारा सुद्धा थोरात यांनी दिला.

बाळासाहेब थोरात यांनी म्हटल्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांशी अजिबात करता येणार नाही. मोदींचे विभाजनशील राजकारण आणि सीएए आणि एनआरसी यासारख्या जातीय धोरणांबद्दल, सरकार चालवण्याचा त्यांचा निरंकुश स्वभाव छत्रपती महाराजांनी स्वराज्य स्थापलेल्या धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनाशी कुठेही ताळमेळ साधत नाही. तसेच, आपल्या सरकार च्या कार्यकाळात समुद्रातील शिवाजी स्मारक प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणाऱ्या भाजपने नैतिकदृष्ट्या शिवाजी महाराजांचे नावही घेऊ नये. असे म्हणत थोरात यांनी भपवर निशाणा साधला होता.

(हे ही वाचा- शिवाजी महाराजांची तुलना करू नयेच! पण शरद पवार यांना जाणता राजा म्हटलं तर का चालतं?- सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार)

दरम्यान, उद्याच्या या आंदोलनात भाजपच्या विरुद्ध हजारो कार्यकर्ते आणि समर्थक निषेधात सहभागी होतील असे सांगितले जात आहे. तुर्तास या पुस्तकाचा वाद चिघळत जाऊन लेखक जयभागवण गोयल यांच्यावर सोलापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर काही वेळापूर्वी भाजपने आपला या पुस्तकाशी काहीही संबध नाही असे म्हणत स्पष्टीकरण दिले होते.