Mumbai AQI Update: मुंबईत अवकाळी पावसामुळे हवेच्या गुणवत्ता निर्देशकात सुधारणा
त्यामुळे मुंबईकरांचा चिंता वाढली होती. मात्र कालच्या पावसाने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील (Mumbai) हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे (Air Pollution) हवेची गुणवत्ता मागील दोन महिन्यांपासून ढासळत चालली होती. मात्र काल रात्री पडलेल्या पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारली आहे. सध्या मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी (AQI) 50 च्या खाली आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात एकही उपनगर नाही जिथे AQI 100 हून आधिक आहे. बुधवारी सकाळी 8 वाजेच्या आकडेवारीनुसार, हवेची गुणवत्ता बोरिवली येथे 35, अंधेरी (पूर्व) 39, ठाणे 38, मुलुंड 42 एवढी होती. (हेही वाचा - Mumbai Weather Update: मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली, AQI 190 हून पुढे पोहोचला)
मागील काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता 300 वर पोहोचली होती. त्यामुळे मुंबईकरांचा चिंता वाढली होती. मात्र कालच्या पावसाने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी रात्री अचानक मुंबईत आलेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडवली. या पावसाचे फोटो आणि व्हिडिओ देखील अनेकांनी सोशल मिडियावर पोस्ट केले.
दरम्यान मुंबईत पुढील 18-24 तासांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल. मात्र पाऊस पडला तर तो फार वेळ टीकणार नाही, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.