IPL Auction 2025 Live

Mega Block on Sunday, May 26, 2024: मध्य, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; बाहेर पडण्यापूर्वी वेळ आणि इतर तपशील एकदा पहा

त्यामुळे 26 मे रोजी रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

मुंबई लोकल ट्रेन (Photo Credits: PTI)

Mega Block on Sunday, May 26, 2024: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक (Mega Block) घेतला जाणार आहे. या काळात रेल्वेची विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. हा मेगाब्लॉक माटुंगा - ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर घेतला जाणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरून सुटणारी आणि सीएसएमटीकडे येणारी अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा - ठाणेदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे या लोकल विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहूर या स्थानकात थांबणार नाहीत. (हेही वाचा:Western Railway Plans to Extend 6th Line: जून 2024 पर्यंत पूर्ण होणार सहाव्या मार्गिकेचा कांदिवलीपर्यंतचा विस्तार; पश्चिम रेल्वेने दिली महत्त्वाची माहिती)

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मरिन लाइन्सदरम्यान वानखेडे पादचारी पुलाच्या मुख्य गर्डरची उभारणीसाठी शनिवारी रात्री 1.10 ते पहाटे 4.10 वाजेपर्यंत तीन तासांचा ब्लॉक असणार आहे. लोकल अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

बोरिवली-गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हा मेगाब्लॉक सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. ब्लॉक कालावधीत बोरिवली - गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार असून काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. अंधेरी आणि बोरिवली लोकलला हार्बर मार्गावरून चालवण्यात येईल. तसेच बोरिवली फलाट क्रमांक 1 ते 4 वरून धावेल.

हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत असणार आहे. सीएसएमटी - चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सीएसएमटी, वडाळा रोड ते वाशी, बेलापूर, पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी - वांद्र,गोरेगाव अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल - कुर्लादरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावतील.