Ganesh Chaturthi 2020: ‘गिरगावचा राजा’ गणेशमंडळाचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 21 फुटाची गणेश मुर्ती न बसवण्याचा निर्णय, भक्त करू शकणार ऑनलाईन दर्शन

मुंबईच्या प्रसिद्ध ‘गिरगावचा राजा’ मंडळाने यंदा 21 फुटाची गणेश मुर्ती न बसवता याऐवजी यंदा छोट्या मुर्तीची विधिवत पुजा करुन भक्तांना ऑनलाईन दर्शनाची सोय करुन देण्याचं ठरवलं आहे. मंडळाने फेसबुकच्या माध्यमातून निर्णय जाहीर केला. मंडळाने घरी बसून भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्याचे आवाहन ‘गिरगावचा राजा’ गणेश मंडळाने केले आहे.

गिरगावचा राजा (Photo Credit: Facebook)

भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. मुंबईसह देशाच्या अनेक राज्यांना याचा फटका बसला आहे. या जागतिक महामारीचा यंदाच्या गणेशोउत्सवावरही (Ganeshotsav) संकट बनलेलं आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने पुढाकार घेऊन गणेशोत्सव मंडळाना यंदा गणेश मूर्ती कमी उंचीची बसवत उत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. आणि आता याचा आवाहनाला प्रतिसाद देत, मुंबईच्या प्रसिद्ध ‘गिरगावचा राजा’ (Girgaon Cha Raja) मंडळाने यंदा 21 फुटाची गणेश मुर्ती न बसवता याऐवजी यंदा छोट्या मुर्तीची विधिवत पुजा करुन भक्तांना ऑनलाईन दर्शनाची सोय करुन देण्याचं ठरवलं आहे. मंडळाने फेसबुकच्या माध्यमातून निर्णय जाहीर केला. मंडळाने घरी बसून भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्याचे आवाहन ‘गिरगावचा राजा’ गणेश मंडळाने केले आहे. मुंबईत सर्वात महत्त्वाचा आणि मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणारा गणेशोत्सव यंदा साधे पणाने साजरा करण्याचे आवाहन महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आले होते. ('मुंबईचा राजा' बाबत गणेश गल्लीतील मंडळाने घेतला मोठा निर्णय! 22 फुटांऐवजी 4 फूटांची असणार गणेशाची मूर्ती)

यापूर्वी, 'मुंबईचा राजा' (Mumbaicha Raja) म्हणून ओळख असणाऱ्या गणेश गल्ली (Ganesh Galli) मंडळाने मुंबईच्या राजाची मूर्ती ही 22 फूटांऐवजी 4 फूटांची मूर्ती बसवणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. यंदा मुंबईच्या राजाची मूर्ती ही 4 फूटाची असणार असून त्याचे कृत्रिम तलावात विसर्जन केले जाईल अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल परब (Swapnil Parab) यांनी दिली आहे.

सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून यंदा सर्व भक्तांना 'गिरगावचा राजा'चे दर्शन घेता येणार आहे. इतकेच नाही तर विसर्जन सोहळ्याचं आयोजन न करता कृत्रिम तलावात राजाचे विसर्जन करून निरोप दिला जाईल असं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. जगातील इतर देशांप्रमाणे महाराष्ट्रही कोरोनाच्या जाळ्यात अडकला आहे. या विषाणूचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी यंदा अनेक धार्मिक सण-उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यावर मनाई करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement