Sharad Pawar Health: शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

महाराष्ट्रात उद्या तिसऱ्या टप्प्यासाठी 11 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.

Sharad Pawar | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सध्या देशात लोकसभा निवडणूकीचे  (Lok Sabha Election)वातावरण आहे. अशा मध्ये प्रत्येकच नेता निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या जीवाचे रान हे करत असतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अनेक सभा होत्या. तसेच अनेक नियोजित कार्यक्रम होते. मात्र तब्येत अस्वस्थामुळे शरद पवारांचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. शरद पवार यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांचे उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम करण्यात आले रद्द आहेत.   (हेही वाचा - Lok Sabha Election 2024: दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपची उमेदवारी मागे, महाविकास आघाडीला दिलासा)

महाराष्ट्रातही आज तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अनेक नेत्यांचा वेगवेगळ्या भागात प्रचारांचा धडाका पाहायला मिळाला. महाराष्ट्रात उद्या तिसऱ्या टप्प्यासाठी 11 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. आज बारामती येतेच शरद पवार यांची सांगता सभा होती. या सभेदरम्यान शरद पवार यांना काहीसा त्रास जाणवल्याने त्यांनी थोडक्यात भाषण केलं. यातच आता शरद पवार गटाच्या वतीने सांगण्यात आलं आहे की, शरद पवार यांचे उद्याचे जे नियोजित कार्यक्रम आहेत, ते रद्द करण्यात आले आहेत.

शरद पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते असल्याने राज्यभरात अनेक ठिकाणी सभा घेत होते. मविआच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी दौरे केले आहेत. सततचे कार्यक्रम आणि दौऱ्यांमुळे झालेल्या धगधगीमुळे त्यांना आता अस्वस्थ वाटतं असावं, असं बोललं जात आहे. यावेळी शरद पवार गटाच्या नेत्यांनी सांगितलं की, त्यांची तब्येत स्थिर असून एक दिवस विश्रांती म्हणून उद्याचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.