नागपूर: ओव्हरटेक करण्याच्या नादात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू, अपघाताचा चित्तथरारक व्हिडिओ फेसबुक लाइव्ह मध्ये कैद

धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा हा अपघात झाला तेव्हा अपघातापूर्वीच त्यांचे फेसबुक लाईव्ह सुरु होते.

Road Accident (Photo Credits: File photo)

आजकाल व्हॉट्सअॅप, फेसबुक लाईव्ह यांसारख्या गोष्टींमुळे आपलेले वैयक्तिक आयुष्य आपण सोशल मिडियावर शेअर करत असतो. मात्र याच प्रकारात आज आपल्यासमोर आलाय चित्तथरारक असा अपघाती मृत्यू. भरधाव वेगात असलेली कार ओव्हरटेक करण्याच्या नादात नागपूरात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा हा अपघात झाला तेव्हा अपघातापूर्वीच त्यांचे फेसबुक लाईव्ह सुरु होते.

पुंकेश पाटील (Punkesh Patil) आणि संकेत पाटील (Sanket Patil) अशी मृत झालेल्या दोघांची नावे असून दोघे नागपूरातल्या कैलासनगरमध्ये राहणारे होते. काही कामानिमित्त ते काटोल तालुक्यात चालले होते. कारने जात असताना त्यांच्या सोबत त्यांचे मित्रही होते. पुंकेश आणि संकेत हे कारमध्ये पुढील सीटवर बसले होते आणि मागे बसलेला त्यांचा मित्र त्याचे फेसबुक लाईव्ह करत होता.

हातला येथील शिवाराजवळ जेव्हा गाडी आली तेव्हा एकामागोमाग एक आपल्या पुढील गाड्यांना ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांचे कारवरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. ही संपूर्ण घटना फेसबुक लाईव्हवर कैद झाली आहे. पुंकेश पाटीलच्या फेसबुक पेजवर अनेकांनी या व्हिडिओखाली हळहळ व्यक्त केली आहे.

हेही वाचा: Road Accident Near Nashik: नवस फेडून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला नाशिक मार्गावर भीषण अपघात, 4 जण ठार, 6 जण गंभीर जखमी

या घटनेने संपुर्ण पाटील कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर काटोल आणि नागपूरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.