Anil Deshmukh: तब्बल १ वर्ष १ महिन्यानंतर आज अनिल देशमुखांची सुटका होणार
अखेर १ वर्ष १ महिन्यांच्या दिर्घ कालावधीनंतर आज अनिल देशमुखांची अखेर सुटका होणार आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज तब्बल १ वर्ष १ महिना आणि २६ दिवसांच्या कोठडीनंतर सुटका होणार आहे. १ नोव्हेंबर २०२१ रोजी अनिल देशमुखांना १०० कोटींच्या कथित घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. अजूनही या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरु असुन १०० कोटींचा खटला मुंबई उच्च न्यायालयात सुरु आहे. तर काल कोर्टाकडून अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला असुन आज आर्थर रोड जेलमधून देशमुखांची सुटका होणार आहे. राष्ट्रवादी पक्षात आज उत्साहाचं वातावरण आहे. देशमुखांच्या सुटकेनंतर आर्थर रोड जेल ते सिध्दीविनायक मंदीर अशी रॅली काढण्यात येणार आहे. राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. कालचं अधिवेशनात एकमताने महाराष्ट्र-कर्नाटक सिमावाद कर्नाटक विरोधी उठाव विधान सभेत एकमताने मंजूर झाला. तरी आज देशमुखांच्या सुटकेचे अधिवेशनात काय पडसाद उमटणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती संपली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत अनिल देशमुखांच्या जामिनावरची स्थगिती वाढवा, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती. मात्र जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली असुन अखेर १ वर्ष १ महिन्यांच्या दिर्घ कालावधीनंतर आज अनिल देशमुखांची अखेर सुटका होणार आहे. (हे ही वाचा:- Ajit pawar In Legislative Assembly: शिवलेले कोट वापरा त्याला उंदीर लागतील; अजित पवार यांचा सत्ताधारी आमदारांना टोला)
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. ईडीनं देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली पण काल मात्र अनिल देशमुखांची जामीन मंजूर झाला असुन त्यांची आज सुटका होणार आहे.