साहेबांचं कार्टून की कार्टून साहेब? व्यंगचित्रातून भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार

भाजपनं व्यंगचित्र काढत राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. महाराष्ट्र भाजपनं हे व्यंगचित्र ट्विटरवर शेअर केले आहे.

साहेबांचं कार्टून की कार्टून साहेब? व्यंगचित्रातून भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार
भाजपचं व्यंगचित्र (Photo Credit : Twitter)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे व्यंगचित्र हे शस्त्र झाले आहे. आपल्या व्यंगचित्रातून ते अनेकदा राज्य सरकार, मोदी यांच्यावर फटकारे मारत असतात. दिवाळीनिमित्त त्यांनी नवी व्यंगचित्र मालिका सुरु केली होती. त्यातूनही त्यांनी अनेक नेत्यांवर निशाणा साधला. आता मात्र भाजपनं व्यंगचित्र काढत राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. महाराष्ट्र भाजपनं हे व्यंगचित्र ट्विटरवर शेअर केले आहे.

भाजपाच्या व्यंगचित्रातून राज ठाकरेंची जबरदस्त खिल्ली उडवण्यात आली आहे. या चित्रात राज ठाकरे व्यंगचित्र काढण्यात मग्न असल्याचे दिसते. मागून पक्षातील कार्यकर्ते "साहेब, लोकसभा निवडणूका जवळ आल्या!," "साहेब, विधानसभा निवडणूका जवळ आल्या!," असे बोलताना दिसत आहेत. त्यानंतर कार्यकर्ते म्हणतात, "साहेब, आपल्याला एकही जागा जिंकता आली नाही." तरीही राज ठाकरे व्यंगचित्र काढण्यात गर्क असल्याचे दाखवण्यात आले आहे. अशा आशायाचं व्यंगचित्र भाजपने ट्विटरवर शेअर करत लिहिले की, "साहेबांचं कार्टून की कार्टून साहेब?"

मोदी, फडणवीस सरकारला आपल्या व्यंगचित्रातून लक्ष्य करणाऱ्या राज ठाकरेंवर आता खुद्द भाजपाने पलटवार केला आहे. कालच राज ठाकरेंनी अवनी वाघिणीच्या हत्येवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला होता.

(The above story first appeared on LatestLY on Nov 14, 2018 09:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).