शिवसेना आणि भाजप अजूनही एकत्र? भाजप च्या 'या' दोन नेत्यांनी घेतली संजय राऊत यांची लीलावती रुग्णालयात भेट

सत्ता स्थापनेच्या वादामुळे शिवसेना आणि भाजप (BJP Shivsena Alliance) या दोन्ही पक्षांमध्ये बिनसलं असलं तरी भाजपचे काही नेते अजूनही शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहेत असं म्हणायला हरकत नाही.

Sanjay Raut in hospital (Photo Credits: ANI)

सत्ता स्थापनेच्या वादामुळे शिवसेना आणि भाजप (BJP Shivsena Alliance) या दोन्ही पक्षांमध्ये बिनसलं असलं तरी भाजपचे काही नेते अजूनही शिवसेना  नेत्यांच्या संपर्कात आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण नुकतेच भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली आहे.

छातीत दुखत असल्याने शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut in hospital) यांना काल मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे शिवसेना आणि भाजपमधील नातं अजूनही कायम आहे की काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हृदयात दोन ब्लॉकेज असल्याचं निदान काल करण्यात आलेल्या अँजिओग्राफीमध्ये झालं असून त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. मात्र तरीही सत्ता स्थापनेच्या संघर्षात संजय राऊत अजूनही तितकेच आक्रमक आहेत.

हॉस्पिटल मधून सुद्धा आज त्यांनी एक ट्विट केले आहे. हरिवंशराय बच्चन (Harivanshrai Bachchan) यांच्या "लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती । या ओळी ट्विटमध्ये लिहीत सोबतच' हम होंगे कामयाब.. जरूर होंगे... असे राऊत यांचे ट्विट आहे.



संबंधित बातम्या