IPL Auction 2025 Live

Mumbai Rain and High Tide Today: मुंबईच्या सुमद्रात आज दुपारी 2.14 मिनिटांनी येणार भरती; शहरातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता- BMC

मात्र आज हायटाईड असल्यामुळे लोकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

मुंबईत उच्च भरती | प्रतिनिधित्व प्रतिमा | (Photo Credits: PTI)

मुंबईत काल (21 ऑगस्ट) सकाळपासूनच चांगला जोर धरला होता आणि आजही पावसाची संततधार चालूच आहे. मुंबईत (Mumbai) आज दिवसभर पावसाचा हा जोर कायम राहणार असून आज दुपारी समुद्राला भरती येणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेने (BMC) सांगितले आहे. यामुळे दुपारी 2.14 मिनिटांनी समुद्रात 4.67 मीटरच्या (High Tide in Mumbai) लाटा उसळणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. त्याचबरोबर आज मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आज सर्वत्र गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) निमित्त लोक गणेशाची मूर्ती आणण्यासाठी घराबाहेर पडले असतील. मात्र आज हायटाईड असल्यामुळे लोकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. दिलासादायक! मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा तलाव अखेर ओसंडून वाहू लागले; मुंबई महानगरपालिकेने दिली माहिती

दरम्यान जुलैमध्ये मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाने या शहरांना झोडपून काढलं. त्यानंतर काही दिवस दडी मारुन बसलेला पाऊस 10-11 ऑगस्ट दरम्यान पुन्हा सक्रिय झाला. कमी-अधिक प्रमाणात बसरसत असलेल्या पावसाने काल पासून दमदार बॅटिंगला सुरुवात केली.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरण आणि तलावक्षेत्रामध्ये ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस बरसल्याने आता मुंबईकरांवरील पाणीकपात 20% वरून 10% करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने केला आहे. दरम्यान 21 ऑगस्टपासून आता मुंबई शहर आणि बीएमसी (BMC) कडून पाणीपुरवठा होणार्‍या ठाणे (Thane), भिवंडी महानगरपालिका (Bhiwandi) आणि आजुबाजूच्या गावांनादेखील दिलासा मिळणार आहे.