Propose Day 2020: 8 फेब्रुवारीला का साजरा केला जातो प्रपोज डे? यंदा तुमच्या व्हॅलेंटाईनला मागणी घालण्यासाठी 'या' जागा ठरतील बेस्ट पर्याय
जर का तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रपोज करायचे ठरवले असेल तर 'या' ठिकाणी मागणी घातल्यास हा क्षण कायम लक्षात राहणारा ठरेल.
जगभरात 14 फेब्रुवारीला व्हॅलेनटाईन डे (Valentine’s Day) साजरा होतो. मात्र त्याचा उत्साह सात दिवस आधी पासूनच विविध डेच्या रूपात दिसून येतो. उद्या रोज डे पासून या व्हॅलेनटाईन वीक ला सुरुवात होणार आहे, त्यानंतर प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे असे सर्व दिवस साजरे होणार आहेत. आज आपण व्हॅलेंटाईन वीक मधील दुसरा आणि अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजेच प्रपोज डे विषयी जाणून घेणार आहोत. आपल्यावर कोणीतरी प्रेम करावे आणि त्या प्रेमाचे कबुली ही तितक्याच खास पद्धतीने द्यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि जर का तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि त्या व्यक्तीला स्पेशल फील करून द्यावे अशी तुमची इच्छा असेल तर तुमचा हा मनसुबा पूर्ण करण्यासाठी प्रपोज डे (Propose Day) (8 फेब्रुवारी) च्या निमित्ताने आयती संधी तुमच्या दारावर चालून आली आहे. साहजिकच प्रपोज करताना नेमके काय बोलावे, काय गिफ्ट द्यावे, कुठे प्रपोज करावे असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. या सगळ्याची उत्तरे आम्ही तुम्हाला देणार आहोत मात्र तत्पूर्वी या दिवसाचे महत्व जाणून घ्या..
तुम्ही जर का व्हॅलेंटाईन वीकचे सगळे दिवस एका ओळीत पाहिलेत तर ही प्रेमाच्या बांधणीची प्रक्रिया म्हणता येईल, अर्थात या प्रक्रियेची सुरवात प्रेम कबुल करण्यापासून होते यात काही आश्चर्य नाही. तर आता जर का तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रपोज करायचे ठरवले असेल तर 'या' ठिकाणी मागणी घातल्यास हा क्षण कायम लक्षात राहणारा ठरेल.
खाण्याची ठिकाणे
सर्वात पहिली टीप म्हणजे तुमच्या आवडत्या व्यक्तीला काय आवडतं याकडे लक्ष द्या. जर का तुमची प्रिय व्यक्ती असेल तर एखाद्या खाण्याच्या ठिकाणी नेऊन मनसोक्त खाऊ घालून त्यांचं मन आणि पोट तृप्त झाल्यावर मागणी घाला. आनंदी असताना तुम्हाला पॉझिटिव्ह उत्तर मिळण्याचे जास्त चान्स आहेत. हॉटेल्स किंवा स्ट्रीट फूड असा कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकता.
कँडल लाईट डेट
ही खूप जुनी आणि टिपिकल पद्धत आहे, पण म्हणतात ना ओल्ड इज गोल्ड अगदी तसेच एक सुंदर रोमँटिक संध्याकाळ आपल्या प्रिय व्यक्तीसोबत घालवून तुम्ही आपलं मन मोकळं करू शकता. कँडलचा प्रकाश, रोमँटिक म्युझिक आणि आता पडलेली गुलाबी थंडी वातावरणात प्रपोज करणे ही एकदम योग्य वेळ असते.
निसर्गाच्या सानिध्यात
ट्रेक/ धबधबा/ जंगल/ तलाव किंवा निसर्गाच्या सानिध्यात एखाद्या ट्री हाऊस मध्ये वीकएंड ट्रीप प्लॅन करून इथेच तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला मागणी घालू शकाल. अनायसे प्रपोज डे हा यंदा शनिवारी आला आहे त्यामुळे एका छोट्या वीकेंड प्लॅन साठी हा उत्तम योग आहे.
डान्स क्लब
जर का तुमची आवडती व्यक्ती पार्टी ऍनिमल असेल तर एखाद्या क्लब मध्ये नेऊन नाचत गात असताना तुम्ही प्रेम व्यक्त करू शकता. आणि अर्थात जर का अक्ख्या क्लब समोर तुमच्यासाठी कोणी गुडघ्यावर बसून प्रपोज केले तर कोणाला नाही आवडणार?
गर्दीचे ठिकाण
जर का तुमच्या प्रिय व्यक्तीने कधीहि अशी इच्छा बोलून दाखवली असेल किंवा तुमच्या निरीक्षणानुसार त्या व्यक्तीला हा प्रकार आवडणार असेल तर ही रिस्क घेऊ शकता. तुमच्या मित्रमैत्रिणीचा छोटासा फ्लॅशमोब ठरवून किंवा एखाद्या मॉल किंवा स्टेशन वर सर्वांच्या समोर तुम्ही प्रपोज करू शकता.
अनेजदा आपण ऐकतो की, प्रेम ही अव्यक्त भावना आहे पण सुंदर शब्दांची गुंफण करून प्रेम व्यक्त करण्याचे थ्रील सुद्धा काही वेगळेच आहे आणि हा अनुभव घ्यायला हवा