Work From Home करताना सतत लॅपटॉप समोर बसून डोळे दुखतायत? 'या' सोप्प्या उपायांनी दूर करा त्रास

अर्थात काम करणे तर टाळता येणार नाही पण काही सोप्पे उपाय करून तुम्ही तुमच्या डोळयांचे आरोग्य जपू शकाल.

Work From Home Eyecare Tips (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरस (Coronavirus) चा प्रादुर्भाव पाहता आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने लॉक डाऊनचा (Lockdown) अवधी वाढवला आहे. 4 मे ते 17 मे या कालावधी लॉक डाऊनचा तिसरा टप्पा असणार आहे. यावेळी सर्व कंपन्यांनी आपापल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) करण्यास सांगितले आहे. मागील महिन्याभरापासून वर्क फ्रॉम होम करताना अनेकांना अनेक अडचणी आल्या असतील. कामाचे नियोजन ते आरोग्याच्या तक्रारी आपल्याला सतावत असतील. यामध्ये सर्वात कॉमन त्रास म्हणजे डोळेदुखी (Eyes Painining). सतत लॅपटॉप, स्मार्टफोन पाहत असल्यास डोळयांवर तणाव येऊन डोळे आणि डोके दुखू लागते. अर्थात काम करणे तर टाळता येणार नाही पण काही सोप्पे उपाय करून तुम्ही तुमच्या डोळयांचे आरोग्य जपू शकाल. काम करण्याची पद्धत, लॅपटॉप चा ब्राईटनेस या गोष्टींसहित जागच्या जागीच करायचे डोळ्याचे व्यायाम आपण या लेखातुन जाणुन घेणार आहोत.

Lockdown काळात सुरु झालेल्या Work From Home मुळे कंपन्या खुश; 74 टक्के सीएफओंना लॉकडाऊन नंतरही सुरु ठेवायची आहे हीच व्यवस्था- सर्वेक्षणातून खुलासा

वर्क फ्रॉम होम करताना कशी घ्यावी डोळ्यांची काळजी..

-जर तुम्ही काम करत असाल तर डोळ्यांची सतत उघडझाप करत राहा. यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा तसेच जळजळ होत असल्यास आराम मिळेल.

- 4 ते 5 वेळा डोळे थंड पाण्याने धुवा.

- कमी उजेडात काम करू नका, असे केल्यास लॅपटॉपच्या स्क्रीनचा उजेड थेट डोळ्यांत पडतो आणि त्रास वाढतो, त्याऐवजी रूममधील लाईट्स सुरु ठेवून काम करा किंवा सूर्यप्रकाश पडेल अशा ठिकाणी काम करा.

- कोरफडीच्या जेलने डोळ्याला मसाज करा.

- चष्मा असल्यास तो वापरण्यात अजिबात हलगर्जी करू नका.

- किमान 1 तासाने 20 मिनिटांंचा ब्रेक घ्या.

- डोळे बंद करून शांत बसा व दिर्घ श्वास घ्या, दोन्ही तळहात एकमेकांवर गरम होईपर्यंत घासा. मग गरम तळहात डोळ्यांवर ठेवा.

- डोळे गोल फिरवणे, आजुबाजुला फिरवणे, खाली वर पाहणे, नाकाच्या टोकाकडे पाहणे असे मोजके व्यायाम करा.

(टीप- हे सर्व प्राथमिक उपचार आहेत घेण्यासाठीचे पर्याय आहेत, मात्र तुम्हाला जास्त त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.)