Google Doodle Nowruz 2022: पारसी नववर्ष नवरोज निमित्त गूगल डूडल बनवत सर्च इंजिनकडून हटके शुभेच्छा

पारसी समाजातील परंपरांनुसार 'नवरोज' (Navroz) हा वसंत ऋतूतील पहिला दिवस असतो. त्यामुळे गूललनेही या अत्यंत आनंदाच्या आणि वेगळ्या दिवसानिमित्त जगभरातील पारसी समूहाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Nowruz 2022 | (Photo Credit - Google )

पारसी नववर्ष ( Navroz 2022) निमित्त गूगलने खास डूडल (Google Doodle) साकारत आपल्या होमपेजच्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या आहेत. पारसी समाजातील परंपरांनुसार 'नवरोज' (Navroz) हा वसंत ऋतूतील पहिला दिवस असतो. त्यामुळे गूललनेही या अत्यंत आनंदाच्या आणि वेगळ्या दिवसानिमित्त जगभरातील पारसी समूहाला शुभेच्छा दिल्या आहेत. नवरोज निमित्त सादर करण्यात आलेल्या या डूडलध्ये (Google Doodle Nowruz 2022) रंगांचा उत्सव दाखवला आहे. ज्यात अनेक रंगीबेरंगी फुले आणि मधमाशा दिसत आहेत. शिवाय गिटार हे वाद्यही पाहायला मिळत आहे. ज्यामुळे पाहताक्षणीच लक्षात येते की वसंत ऋतू (Spring Season) सुरु झाला आहे.

जगभरातील पारसी लोक आज आपला हा खास सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. नवरोझ हा एक फारसी भाषेतील शब्द आहे. जो नव आणि रोज या दोन शब्दांचे एकत्रीकरण करुन केला जातो. नव म्हणजे नवा आणि रोज म्हणजे दिवस. त्यामुळे नवरोजचा अर्थ असा की, दररोज नवा दिवस. नवरोज साजरा करण्याचा इतिहास हा पाठिमागील जवळपास 3000 वर्षांपेक्षाही जूना आहे. पारसी समूह या दिवसाला पतेती किंवा जमशेदी नावानेही साजरा करतो किंवा ओळखतो. (हेही वाचा, Rosa Bonheur Google Doodle: फ्रेंच अ‍ॅनिमल पेंटर रोसा बॉनहर यांच्या 200 व्या जयंती निमित्त गूगलचं खास डूडल)

पारसी समूह नवरोज दिनानिमित्त भल्या पहाटे उठतो. लहान मुलेही सकाळी सकाळी छान तयार होतात. नवे कपडे घालतात. या दिवशी घर साफ करण्याचीही पद्धत आहे. पारसी मंदिरात या दिवशी विशेष प्रार्थना होते. ज्यात पारसी समूहातील लोक सहभागी होतात. एकमेकांन नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या जातात. सांगितले जाते की, शाह जमशेदजी यांनी पासशी धर्मामध्ये नवरोज साजरा केला जाण्याची शक्यता आहे. थंडीनंतर वसंत ऋतूचे आगमन होते आणि चैत्रपालीवने निसर्ग हिरवाईने नटू लागतो.